पुणे / नगर सहयाद्री- पुण्यातील धायरी भागात एका पेंट कंपनीला भीषण आग लागली. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारा अग्नीने रुद्र रूप धारण के...
पुणे / नगर सहयाद्री-
पुण्यातील धायरी भागात एका पेंट कंपनीला भीषण आग लागली. मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारा अग्नीने रुद्र रूप धारण केले जवळपासच्या कारखान्यांमध्येही ही आग जोरदार पसरली आणि 10 सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पेंट फॅक्टरीच्या आजुबाजूच्या 6 या कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार,पुण्यातील धायरी परिसरातील गणेश नगर गल्ली क्रमांक 22 मध्ये पेंट निर्मितीचा मोठा कारखाना आहे. या कारखान्यात अचानक आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या भीषण आगीमुळे आजूबाजूच्या 6 कारखान्यांचेही मोठे नुकसान झाले. तर 10 सिलिंडरचे स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. यामध्ये अनेक वाहनेही जाळली आहेत.
माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मोठ्या शर्थीनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसही घटनास्थळी हजर आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंट फॅक्टरीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली.
COMMENTS