अहमदनगर / नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. १५ फुटी बोअरवेल मध्ये पडलेल्या ५ वर्ष...
अहमदनगर / नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. १५ फुटी बोअरवेल मध्ये पडलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचामृत्यू झाला आहे.चिमुकल्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य केले. मात्र, चिमुकल्याला वाचवण्यात अपयश आले. या घटनेमुळे कोपर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सागर बारेला असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,मध्यप्रदेश मधील बुऱ्हाणपुर येथून ऊस तोडीच काम करण्यासाठी बरेला कुटुंबीय कर्जत तालुक्यात आलं. त्यांना ऊस तोडीच काम मिळाल व ते शेतात एका झोपडीत राहू लागले. शेतात असलेल्या बोअरवेल मध्ये बलरे कुटुंबातील सागर बरेला हा खेळताना पडला.
सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास सागरकुठेही दिसेना त्यामुळे त्याची शोधाशोध झाली मात्र रडण्याच्या आवाजाने अखेरकार तो बोअरवेल मध्ये पडल्याचे दिसले. दरम्यान कर्जत येथील प्रशासनाने NDRF टीम दाखल होईपर्यंत ऑक्सिजनच्या नळ्या बोअरवेल मध्ये सोडल्या होत्या.NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली.
सागरला बाहेर काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला आणि सागरला बाहेर काढण्यासाठी तब्बल ८ तासांचा कालावधी गेला. NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला 15 फुटी बोअरवेल मधून बाहेर काढण्यात आले .मात्र त्या दरम्यान त्याला वाचवण्यात यंत्रणेला अपयश आले होते. ऊसतोडणीसाठी परराज्यातून आलेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS