छत्रपती संभाजीनग । नगर सहयाद्री - छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ह्रदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. नगरदेवळा येथील पिता प...
छत्रपती संभाजीनग । नगर सहयाद्री -
छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात ह्रदयद्रावक घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. नगरदेवळा येथील पिता पुत्रावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैय्यद सबदर सैयद इस्माईल (वय ५८ वर्ष) असे मयत वडिलांचे नाव आहे. मुलगा आबिद सैय्यद सबदर हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहिती नूसार, रोज नेहमीप्रमाणे कामावरुन घरी जात असताना बाप लेकावर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढवल्याचा घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये पित्याचा मृत्यू झाला असून जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शिंदोली येथे ही घटना घडली आहे.
सैय्यद सबदर इस्माईल व त्यांचा मुलगा अबीद सैय्यद इस्माईल हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी चार वाजता घराकडे परतत असताना शिंदोळ गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर बसलेल्या मधमाश्या अचानक उठल्या. माशांनी दोघांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने दोघेही घाबरुन गेले. यावेळी मधमाश्यांनी तोंडावर, डोक्यात आणि हात पायांवर जोरदार डंख मारले. या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला.
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात हलविला. दरम्यान डोळ्या देखत काही क्षणात पित्याचा मृत्यू झाल्याने मुलाला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे घरातील कर्त्या पुरूषाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS