नाशिक / नगर सहयाद्री - नाशिकमध्ये दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थिनीं मध्ये तुफान राडा झाला. शाळेच्या गेटसमोरच तरुणी एकमेकींना भिडल्या. ...
नाशिक / नगर सहयाद्री -
नाशिकमध्ये दहावीचा पेपर सुटल्यानंतर विद्यार्थिनीं मध्ये तुफान राडा झाला. शाळेच्या गेटसमोरच तरुणी एकमेकींना भिडल्या. झिंज्या ओढत एकमेकींना अक्षरशः लोळवले. मुलींमधल्या भांडणाचे कारण समजू शकले नाही.
नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयाच्या बाहेर दहावीत शिकणाऱ्या तरुणी किरकोळ कारणाहून दहावीचा पेपर सुटल्यानंतर आपापसात भिडल्या. भर रस्त्यावर या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली. यातल्या अनेकांनी या हाणामारीचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग केले.
सातपूरमधल्या विद्यार्थिनींमधील हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यापूर्वीही नाशिक शहरात तीन ते चार वेळेस असे प्रकार घडले आहेत. किरकोळ वादावरून तुफान राडा झाला आहे. तर कधी बॉयफ्रेंडवरून तरुणी भिडल्या आहेत. मात्र, याच वेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुणांनी व्हिडिओ काढून ते शेयर केल्याने जोरदार चर्चा होऊ होत असते.
COMMENTS