टॅटरवर कारवाई, चालक, मालकावर गुन्हा पारनेर | नगर सह्याद्री- तालुयातील मुळा नदीपात्रातुन अवैध वाळू वाहतूक करणार्या टॅटरवर शुक्रवारी पहाटे पो...
टॅटरवर कारवाई, चालक, मालकावर गुन्हा
पारनेर | नगर सह्याद्री-
तालुयातील मुळा नदीपात्रातुन अवैध वाळू वाहतूक करणार्या टॅटरवर शुक्रवारी पहाटे पोलिस अधीक्षक संभाजी गायकवाड यांनी कारवाई केली असून याप्रकरणी चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासबंधीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम (वय ३०) यांनी दिली असून चालक कैलास अनिल जाधव (वय- ३४ वर्षे, राहणार पवळदरा व मालक पोस्ट पोखरी) अंकुश भाऊ काशिद (रा-वारणवाडी ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईत १ ब्रास वाळूसह टॅटर व ट्राली असा ३ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यासंबंधी पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, दि. १६ मार्च रोजी पहाटे ४ वा. चे सुमारास भिमाबाई महादु पवार रा करतारे वस्ती पोखरी यांचे राहते घरी चोरी झाल्यामुळे पो.हे.कॉ. बी.बी भोसले, पो.कॉ. रोकडे ,सुरज कदम, पो.कॉ येताळ, जाधव असे पोखरी गावचे शिवारात पेट्रोलींग करीत असताना पोनि संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की एक ट्रक्टर अवैध वाळू वाहतूक करत आहे.
त्यानुसार वारणवाडी गावचे शिवारात हॉटेल रो हाऊसचे जवळ रोडवर सापळा लावुन थांबले. एक लाल रंगाचा ट्रक्टर वाळू वाहतूक करतांना दिसला. त्यानंतर त्यास वाळु कोठुन भरली, वाळु वाहतुकीचा परवाना आहे काय याची चौकशी केली असता त्याने माझ्या कडे कुठलाही वाळु वाहतुकीचा परवाना नसुन वाळु ही पवळदरा येथील नदीपात्रातुन भरली असल्याचे सांगितले. त्यानुसार अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून ट्रक्टर चालक, मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS