नवी दिल्ली वृत्तसंस्था-: सकाळी उठल्यावर तुमच्या आसपास तुमची आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी कोणीच नसेल तर ? जरा विचार करून बघा. सगळ्याजणी कुठे ...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-:
सकाळी उठल्यावर तुमच्या आसपास तुमची आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी कोणीच नसेल तर ? जरा विचार करून बघा. सगळ्याजणी कुठे बाहेर गेल्या असतील असा विचार करून तुम्ही ऑफीसला जाल, पण तिथेही तुमच्यासोबत काम करणारी एकही महिला कर्मचारी तुम्हाला दिसली नाही तर ? सर्व महिला अचानक सुट्टीवर गेल्या आहेत, अशी बातमी थोड्याच वेळात टीव्हीवर दिसू लागली तर काय काय होणार?
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतही अशीच मोहीम झाली होती. अमेरिकेतील सर्व महिलांनी एक दिवसाच्या सुट्टीवर जायचे ठरवले होते. कोणतेही काम करायचे नाही आणि काही खरेदीही करायचे नाही, असे महिलांनी ठरवसे. 8 मार्च 2017 साली म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांनी हे केले. महिलांच्या योगदानाकडे जगानेही लक्ष द्यायला हवे, हा यामागचा उद्देश होता.
आज ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे. आणि समजा याच दिवशी देशातील सर्व महिला रजेवर गेल्या किंवा कुठेतरी गायब झाल्या तर काय होईल? तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुमच्यासोबत असे काही घडेल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. महिला नसतील तर काय होईल?
ना जेवण, ना साफसफाई
केवळ 6% पुरुषांना जेवण बनवता येतं. 8% टक्के पुरुष हे घराची स्वच्छका आणि 3% टक्के पुरूष कपडे धुण्याचे काम करू शकतात.
देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये 51% आणि कॉलेज-युनिव्हर्सिटीमध्ये 43% महिला शिक्षक आहेत.
बँकेच्या रांगेत तुम्ही उभे रहाल ?
SBIमध्ये 26%, PNBमध्ये 23%, ICICIमध्ये 32% तर HDFC बँकेत 21% महिला कर्मचारी आहेत.
उपचारांसाठी बघावी लागेल वाट
मिळालेल्या माहितीनुसार भारतामध्ये 30% महिला डॉक्टर आहेत तर सुमारे 80% नर्स आहेत.
न्याय मिळण्यासाठी वाट बघाल ?
सुप्रीम कोर्टात 12% आणि हायकोर्टात अंदाजे 14% महिला न्यायाधीश आहेत. तसेच 15 % महिला वकील आहेत.
बातम्या कुठून मिळतील ?
प्रिंट मीडियामध्ये 13% महिला रिपोर्टर. रेडिओमध्ये 21% प्रेझेंटर आणि टीव्हीमध्ये 57% रिपोर्टर या महिला आहेत.
COMMENTS