मुंबई- अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे...
मुंबई-
अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर, मलायकाला पाहिल्यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं. मलायकाला पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांची गर्दी तिच्या भोवती जमली. तिच्या पाहताच अनेकांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये अभिनेत्रीसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
फोटो काढत असताना काही चाहते मलायकाच्या जवळ आल्यामुळे अभिनेत्री संतापली. सेलिब्रिटी अनेकदा विमानताळावर स्पॉट होतात. म्हणून सेलिब्रिटींना पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमते. या गर्दीमध्ये सेलिब्रिटी चाहत्यांसोबत फोटो काढतात, त्यांच्यासोबत गप्पा देखील मारतात. पण काही वेळा चाहत्यांचा उत्साह सेलिब्रिटींसाठी त्रासदायक ठरतो. ज्यामुळे सेलिब्रिटी संतापतात.
मलायका हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. मलायकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. विमानतळावर मलायका असल्यामुळे तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमली. तिच्यासोबत अनेकांना फोटो काढायचा होता. पण काही चाहते फोटो काढण्यासाठी अभिनेत्रीच्या अगदी जवळ आल्यांमुळे मलायका संतापली आणि म्हणाली, आराम से..’, चाहत्यांच्या अशा वागणुकीमुळे मलायका रागावली आणि निघून गेली. सध्या याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
COMMENTS