पुण्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. पुणे। नगर सहयाद्री- पुण्यात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घ...
पुण्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
पुणे। नगर सहयाद्री-
पुण्यात एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आपल्या जिवलग मैत्रिणीचा मृत्यू झाल्याने मित्राने आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. जयेश रामदास मंगळवेढेकर (वय २०, राहणार खराळवाडी, पिंपरी) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्या करण्यापूर्वी जयेश याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मृत तरुणीचा फोटो, भावनिक पोस्ट शेअर केली
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पुण्यातील येरवडा येथे एक तरुणी आपल्या मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने येरवड्याच्या कल्याणीनगर भागात एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. जयेश हा तरुणीचा मित्र होता. जयेश आणि आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेम संबंध होते. मैत्रिणीच्या मृत्यूचा धक्का जयेशला बसला सहन न झाल्याने त्याने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
जयेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मिस यू डार्लिंग' का सोडून गेलीस तू? अशा आशयाची पोस्ट केली. ही पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्याने प्रथम दोन्ही हाताच्या नसा कापल्या, तरीही जीव जात नाही हे पाहून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. मैत्रिणीने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्याचे काम सुरू आहे.
COMMENTS