पुणे। नगर सहयाद्री - पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन...
पुणे। नगर सहयाद्री -
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन दरम्यान असलेल्या फुटपाथवर हा खून झाला. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.
वृत्तसंस्थाच्या माहीतीनुसार, हिंजवडी फेज २ परिसरात पतीनेच पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस स्टेशन दरम्यान असलेल्या फुटपाथवर हा खून झाला. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली.
हिंजवडी येथे एका आयटी कंपनी समोरील फुटपाथवर महिलेचा खून झाला असल्याचं समोर आलं आहे. स्वाती राठोड असे या महिलेचे नाव असल्याची माहिती आहे. महिलेच्या पतीनेच चाकूने भोकसून तिचा खून केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. खून केल्यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
COMMENTS