गोंदिया / नगर सहयाद्री - गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधून शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आ...
गोंदिया / नगर सहयाद्री -
गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधून शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या नात्याला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा अश्लील पॉर्न व्हिडीओ दाखवत छळ करणारी घटना एका विद्यालयात घडली आहे. हेमंतकुमार गुलाराम येरणे (35), रा.इसापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात पीडित विद्यार्थिनी ही नववीच्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडिता व तिच्या मैत्रिणींच्या पाठीवरून हात फिरवायचा. आपल्या कक्षात बोलवून आपल्याकडील मोबाइलमध्ये अश्लील व्हडिओ दाखवयचा. पीडित विद्यार्थिनीला तू मला खुप आवडतेस असा संवाद साधायचा तसेच तिच्या मैत्रिणींशीही असेच अश्लिल वर्तन करायचा.
या सगळ्या प्रकारावर पीडित मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत त्याची लैगिंक इच्छा असल्याचे आपल्या बयाणामध्ये सांगितले आहे. ज्यानंतर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या शिक्षकाविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS