जळगाव। नगर सहयाद्री - साठ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना (२४ मार्च) ला समोर आली होती. गुन्हा दाखल होताच स्थ...
जळगाव। नगर सहयाद्री -
साठ वर्षीय वृद्धाचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना (२४ मार्च) ला समोर आली होती. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेनेगुन्ह्याचा उलगडा करून प्रमुख संशयित तरुणासह मृत वृद्धाच्या सुनेला अटक केली आहे. मृत सासरा सुनेकडे शरीरसुखाची मागणी करत असल्यावरून ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, किनगाव येथील साठवर्षीय ट्रकचालक भीमराव शंकर सोनवणे यांचा मृतदेह शुक्रवारी पहाटे गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील नाल्याचे पुलाखाली आढळून आला होता. मृत भीमराव सोनवणे यांचा मुलगा विनोद याच्या तक्रारीवरून यावल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने ग्रामस्थांशी सलग संवाद, नातेवाइकांची माहिती, सोबतच घटनास्थळावर मिळून आलेल्या पुराव्यांचे अवलोकन करीत निरीक्षक किशन नजन पाटील यांनी मृताच्या सूनबाईला विश्वासात घेतले. सुनेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचे नाव घेताच तिने माहिती देण्यास सुरवात केली. सासरे भीमराव सोनवणे माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली तिने दिली.
सुनेची मोठी बहीण उदळी (ता. रावेर) येथे राहत असून, तिचा मानलेला मुलगा जावेद शहा ऊर्फ जय अलीशहा (वय ३२, रा. प्रतिभानगर, वरणगाव. हल्ली मुक्काम उदळी, ता. रावेर) याच्या संपर्कात सून असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सुरवातीला वरणगाव नंतर उदळी (ता. रावेर) येथे संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोघा संशयितांना अटक करून यावल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
COMMENTS