शेवगाव / नगर सह्याद्री- येत्या जि.प., पंचायत समिती व विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन भाजपचा करेट कार्यक्रम करून योग्...
शेवगाव / नगर सह्याद्री-
येत्या जि.प., पंचायत समिती व विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन भाजपचा करेट कार्यक्रम करून योग्य धडा शिकवावा लागेल त्यासाठी संघटितपणे राष्ट्रवादी सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी करून मी राजकीय डावपेचात काही कच्चा नाही,ते येत्या निवडणुकीत भाजपला भविष्यात समर्थपणे दाखवून देव,ू असा इशाराच घुले यांनी दिला.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत माजी आ चंद्रशेखर घुले पाटील यांना राष्ट्रवादीत फूट पडून एक मताने पराभव पत्करावा लागला. तो अत्यंत जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीच्या फुटीर संचालकांवर कारवाई करून जिल्हाध्यक्षनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी घुले समर्थकांनी करुन तातडीचा मेळावा शेवगाव येथे घेतल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
मात्र माजी आ चंद्रशेखर घुले म्हणाले, जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच नव्हते. प्रथमच भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.भाजपने शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे आहे सांगुन जातीपातीचे राजकारण करून विजय संपादन केला मात्र आज मतदार संघात काय अवस्था आहे. साडे आठ वर्षात मतदारसंघात काय विकास केला असा सवाल केला. स्व.मारुतराव घुले पाटील कुटुंबाने खा. शरद पवार यांना कायम साथ दिलेली आहे ती आजही कायम आहे.
होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती,जिल्हा परिषद, पंचायत समितीसह २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे त्यासाठी एकसंघ राहून मतदार संघात तळागाळात जावून जनतेचे प्रश्न जमजावून घेवून कोणत्याही परिस्थितीत सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी कार्यकर्त्याने सज्य होण्याचे आवाहन करून चंद्रशेखर घुले पाटील यांनी अत्यंत आक्रमक शैलीत विरोधी भाजपवर जोरदार टीका केली.यावेळी केदारेश्वरचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी मार्गशन करून भाजपाच्या कारभारावर जोरदार टीकस्त्र सोडले.यावेळी बद्री बर्गे, बाळासाहेब ताठे, मन्सूर फरोकी,
काकासाहेब नरवडे, शिवशंकर राजळे, मयूर वैद्य, डॉ क्षितीज घुले पाटील, माजी आ पांडुरंग अभंग यांची भाषणे झाली तर आभार भाऊराव भोंगळे यांनी मानले.
शेवगाव येथे राष्ट्रवादीचा मेळावा उपस्थिती नरेंद्र घुले पाटील, माजी आ चंद्रशेखर घुले पाटील, माजी आ पांडुरंग अभंग, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे, बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादीयुवक चे कपिल पवार, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे, डॉ क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, मन्सूर फारोकी, रामनाथ राजपुरे, संजय कोळगे, संजय फडके, काशिनाथ नवले,बंडू बोरुडे, माजी सभापती अरुण लांडे पाटील, बाळासाहेब ताठे, राजेंद्र दौंड, मयूर वैद्य, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, गणेश गव्हाणे, नंदू मुंडे,यांच्यासह पाथर्डी शेवगाव नेवासा तालुयातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS