टीव्ही स्टार शाहीर सम्राट देवानंद माळी यांची उपस्थिती पारनेर | नगर सह्याद्री सत्य अविनाश पारखपद समाजातर्फे पपू सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बा...
टीव्ही स्टार शाहीर सम्राट देवानंद माळी यांची उपस्थिती
सत्य अविनाश पारखपद समाजातर्फे पपू सद्गुरू आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ नातू व सद्गुरु ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराज चौरे यांचे चिरंजीव परमपूज्य सद्गुरु किसन बाबा चौरे यांचा एकोणिसावा पुण्यतिथी सोहळा पारनेर येथे जामगाव रोड येथे आत्मज्ञानी गणपत बाबा मठामध्ये रविवार दि. १९मार्च २०२३ रोजी संपन्न होत आहे .
सालाबाद प्रमाणे यावर्षी किसन बाबा चौरे यांचा महाराष्ट्रभर असणार्या शिष्यांनी या वर्षी पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठ येथे सद्गुरु चौरे यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्याचे ठरवले आहे. प. पु .सद्गुरु किसन बाबा चौरे यांचे अध्यात्मिक अधिष्ठान हे वेगळ्या स्वरूपाचे होते. संसारिक जीवन जगत असताना गुरुज्ञानाचा अवलंब करून परमार्थिक सुख कशाप्रकारे अनुभवावे, सद्गुरुचा साधकाच्या जीवनात कशाप्रकारे लाभ होतो हे किसनबाबांनी आपल्या जीवनात दाखवून दिले.
संपूर्ण महाराष्ट्रभर किसन बाबांचे शिष्य मंडळ पसरलेले आहे. समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती मोडण्यासाठी त्यांनी आपल्या गुरुपदाचा वापर करून शिष्य गणांना पारमार्थिक सुखाची प्राप्ती करून दिली. अहमदनगर जिल्ह्या सह कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ढोलकी डफ तुनतुण्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व समाज प्रबोधनपर कार्य करणारे हे सत्य अविनाश पारखपद समाज असून इतर जिल्ह्यातून हजारो भाविक पारनेरमध्ये या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमतात. पारनेरच्या बाजारपेठेतून सद्गुरु प्रतिमेची भव्य मिरवणूककाढली जाते.अध्यात्मिक भेदिक, भजने व कलगी तुर्याचा सामना या लोककलेच्या माध्यमातून पारनेर शहरात पारनेरकरांना अनुभवयास मिळतो.या कार्यक्रमात दुपारी १२ ते ३ वा. पारखपद सत्संग भेदीक गायन भजन, दुपारी ३ ते ६ वा. पारनेर शहरातुन सद्गुरू प्रतिमेची भेदीक, गायन, लेझिम डावासह मिरवणूक, सायं. ०६ ते ७ वा. सद्गुरू पादुका पुजन, सायं. ७ ते ८ वा. महाप्रसाद , रात्री ८ ते सकाळ पर्यंत अध्यात्मिक भेदीक कलगीतुरा कार्यक्रम होईल. महाराष्ट्राचे लोककलावंत, शाहीर सम्राट देवानंद माळी यांच्या सह महाराष्ट्रातील नामवंत भेदीक शाहीरांचा सवाल जवाबाचा कलगी तुर्याचा कार्यक्रम होईल. कोल्हापुर, सांगली, अहमदनगर, पुणे, सोलापुर इ. ठिकाणाहुन नामांकीत शाहीर आपली सेवा सादर करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून परमार्थिक सुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू . सद्गुरु बबनदादा चौरे , जेष्ठ शाहीर निजामभाई शेख व समस्त सत्य अविनाश पारख पद समाजाकडून करण्यात आले आहे .
COMMENTS