मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक आदर्श जोडपं. दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात....
मुंबई-
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक आदर्श जोडपं. दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात. अक्षय कुमार बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्यस्त असतो तर ट्विंकलचा स्वतःचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. तसेच ती विविध कार्यक्रमात सहभागी होत असते. आपली मतं ठामपणे मांडत असते.
नुकतेच तिने आपल्या मुलीविषयी भाष्य केलं आहे. २०२० साली आलेल्या करोना महामारीच्या आजरामुळे संपूर्ण जगाचे चित्र बदलेले. संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झाले होते. ट्विंकल खन्ना नुकतीच शेफ संजय कपूर यांच्या कार्यक्रमात उपस्थित होती. तेव्हा तिने करोना काळात मुलीला कोणते जेवण दिले याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. ती असं म्हणाली, महामारीच्या काळात मी तिला पीनट बटर सँडविच खायला दिले कारण मला स्वयंपाक करता येत नव्हता.
मला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही. माझ्या पटीने सांगितले होते मी जेवण बनवणार नाही. ती पुढे म्हणाली माझी मुलगी पुढे थेरपी घ्यायला गेली तर ती सांगेल की इतर पालक त्यांच्या मुलांना पास्ता, बनाना ब्रेड असे पदार्थ बनवून देते होते मात्र माझ्या आईने मला फक्त पीनट बटर सँडविच खायला दिले आहे. असे तिने सांगितले.
COMMENTS