बळीराजाची थेट विधानसभेत आ. लंकेंच्या माध्यमातून विधिमंडळ वारीशेतकरांनी प्रेक्षक गॅलरीतून अनुभवले विधानसभेचे कामकाज | आमदार लंकेंच्या माध्यमा...
बळीराजाची थेट विधानसभेत आ. लंकेंच्या माध्यमातून विधिमंडळ वारीशेतकरांनी प्रेक्षक गॅलरीतून अनुभवले विधानसभेचे कामकाज | आमदार लंकेंच्या माध्यमातून विधिमंडळ वारी
पारनेर | नगर सह्याद्री-
एकीकडे शेतीमालाला सह कांद्याला भाव नसल्याने सरकार व विरोधक यांच्यात खडाजंगी रंगली असताना महाराष्ट्रातील मंत्री व लोक प्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील मागण्यांसाठी काय काय करतात, प्रश्न कसे मांडतात हे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी पारनेरच्या बळीराजाने थेट विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धडक दिली आहे. पारनेर तालुयातील वाडेगव्हाण, मावळेवाडी, कुरूंद शेतकर्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. या शेतकरी शिष्टमंडळाला पहिल्यांदाच विधानसभा वारी घडविण्यासाठी आमदार लंके यांनी केले असून यावेळी या शेतकर्यांंसमवेत कांतीलाल भोसले, अनिल गंधाक्ते यांच्या सह पारनेरकर ग्रामस्थ उपस्थित होते.
जनसामान्यांचे आमदार म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या नीलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील काही शेतकर्यांना थेट विधिमंडळाची वारी गुरुवारी घडवून आणली. विशेष म्हणजे या बळीराजांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे कामकाज अनुभवले. तळागाळातील व्यक्तींना अशा प्रकारे थेट विधान भवनात घेऊन येण्याचा हा दुर्मिळ योग विधीमंडळ परिसरात खर्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला.
बळीराजाची इच्छा तातडीने मार्गी..
आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेती आणि शेतकरी आहे. माझ्या मतदारसंघातील हे शेतकरी बांधव आज विधानसभेचे अधिवेशन पाहण्यासाठी आलेले आहेत. यापैकी जवळपास सर्वांनीच पहिल्यांदाच मुंबई पाहिली. गगनचुंबी आणि टोलेजंग इमारती पाहून ते चकित आणि थकीत झाले. वारा आल्यानंतर या बिल्डिंग हलत नसतील ना असा भाबडा सवाल सुद्धा त्यांनी मला केला. हे माझ्या सर्व कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना विधिमंडळाचे अधिवेशन कसे चालते हे पाहायचे आहे. त्यासाठी मी त्यांना येथे घेऊन आलो आहे. माझ्यासाठी सुद्धा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असल्याचे आमदार नीलेश लंके म्हणाले.
पारनेर नगर मतदार संघातील लोकांना आमदार आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती आहे. इतका ऋणानुबंध आमदार नीलेश लंके यांनी निर्माण केला आहे. पारनेर नगर मतदार संघ हे आपले कुटुंब आहे आणि त्यातील प्रत्येक व्यक्ती हा कौटुंबिक सदस्य आहे असे मानणारे आ. लंके यांच्याकडे अबाल वृद्धांपासून प्रत्येक जण वेगवेगळे हट्ट आणि मागणी करतात. त्यापैकी काहींनी राज्याचे विधिमंडळ नेमके कसे चालते. आमदार कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. त्याचे उत्तर संबंधित खात्याचे मंत्री कसे देतात. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या प्रश्नांवर कसा आवाज उठवता.
प्रसार माध्यमांचे बुम, कॅमेर्यांसमोर पत्रकारांशी संवाद
विधानभवन परिसरात आमदार नीलेश लंके यांच्यासोबत धोतर, पायजमा, अंगात नेहरू डोयावर टोपी गळ्यात मुफलर हा खास नगरी आलेल्या शेतकरी पाहून माध्यमांनी संवाद साधण्याची विनंती केली. त्यानुसार वेगवेगळे वृत्तवाहिनीचे बुम त्याचबरोबर कॅमेर्यांच्या वळलेल्या नजरा हे सर्व काही पारनेरच्या शेतकर्यांसाठी विलक्षण होते. आता आपण टीव्हीवर येणार हा आनंद त्यांच्या चेहर्यावर लपत नव्हता त्याचबरोबर कमालीचे समाधान सुद्धा आनंदा बरोबर ओसांडून वाहताना दिसत होते.
न्याय हक्कासाठी कसा प्रकारे भांडता हे सर्व अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली. क्षणाचाही विलंब न लावता आमदार लंके यांनी लागलीच त्यांची मुंबईत येण्याची व्यवस्था केली. त्यांना आमदार निवासामध्ये राहण्याची सोय केली. त्याचबरोबर जेवण आणि चहापानाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांना विधान भवन परिसरात प्रवेश करण्यासाठी विशेष परवानगी घेतली.
आमदार जितेंद्र आव्हाडांकडून आस्थेवाईकपणे चौकशी..
विधान भवन परिसरात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना पाहून संबंधित पारनेरकर शेतकर्यांनी यांना आम्ही टीव्हीवर पाहतोय खूप चांगले बोलतात. आम्हाला त्यांची भेट घालून द्या अशी विनंती केली. त्यानुसार आव्हाड यांनी या सर्वांचे स्वागत करून अतिशय आस्थेने विचारपूस केली.
या व्यतिरिक्त विधानसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीत बसून अर्थसंकल्पीय कामकाज पाहण्याची सोय सुद्धा पारनेर नगरच्या आमदाराने केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी या सर्व शेतकर्यांना आपल्या सोबत घेऊन आमदार लंके विधान भवन परिसरात आले. धोतर, पायजमा, अंगात नेहरू डोयावर टोपी गळ्यात मुफलर हा खास नगरी पेहराव घालू बळीराजा या परिसरात आल्याचे पाहून सर्वजण चकित झाले.
COMMENTS