मुंबई। नगर सहयाद्री- ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशीबदल करत असतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष असं महत्त्व आहे...
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशीबदल करत असतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष असं महत्त्व आहे.ते न्यायदेवतेच्या भूमिकेत असतात. साडेसाती वाले या देवांना खूप घाबरतात. त्यांच्यासाठीच हि आनंदाची बातमी आहे. १८ मार्च २०२३ हा दिवस या लोकांसाठी खुप महत्वाचा आहे.शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवण्यासाठी हा दिवस खास आहे.
काही ग्रह अस्त किंवा उदीत होतात. त्याप्रमाणे त्या ग्रहांचं फळ मिळतं. शनिदेव सध्या स्वराशीत असून उदीत झाल्यानंतर 18 मार्चपासून पूर्ण शक्तिसह कार्यरत होणार आहेत. त्यामुळे जातकांना हा दिवस खास असणार आहे. सध्या साडेसाती आणि अडीचकी सुरु असलेले जातक या दिवशी खास उपाय करून शनिदेवांच्या त्रासातून दिलासा मिळवू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशी अडीचकीच्या फेऱ्यात आहेत.
फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला श्रवण नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी स्वत: शनिदेव आहेत. त्याचबरोबर या दिवशी शिवयोग आहे. त्यामुळे शनिदेवांची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे.शनिवारी एकादशी आल्याने भगवान विष्णुंची पूजा करण्याचा योग जुळून आला आहे. शनिदेव भगवान विष्णुंच्या कृष्णाचे उपासक आहेत.
त्यामुळे या दिवशी शनिदेवांसह भगवान विष्णुंची पूजा केल्यास शनि त्रासातून दिलासा मिळू शकतो. सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करा.पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करून दिवा लावणे, ओम शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करणे , शनिवारी शनि चालीसा आणि शनि स्तोत्राचं पठण करणे अशा सध्या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात .
COMMENTS