मुंबई- छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आह...
मुंबई-
छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केलं. ’जुळून येती रेशीमगाठी’ पासून सुरू झालेला हा प्रवास ’पांडू’, ’पावनखिंड’, ’लकडाउन’,’वाय’ सारख्या चित्रपटांवर येऊन ठेपला.
प्राजक्ता अभिनयासोबतच डान्स लास घेते, प्राजक्त राजची जबाबदारी समर्थपणे पार पाडते. त्यामुळे या सगळ्यात तिला प्रेम करायला वेळच मिळाला नसेल असं अनेकांना वाटतं. मात्र ’वाय’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचा ब्रेकअप झाला होता ही गोष्ट तिनेच एका मुलाखतीत सांगितली होती. आता नक्की प्राजक्तासाठी काय महत्वाचं आहे? प्रेम की करिअर? प्राजक्तानेच त्याचं उत्तर दिलं आहे. प्राजक्ताला नुकताच झी युवा सन्मानमध्ये झी युवा तेजस्वी चेहरा म्हणून गौरवण्यात आलं.
त्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, ’प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. मोठ्यातला मोठा डोंगरही हलवू शकतो प्रेमाने. अर्थात आता आपण अवतीभवती प्रेम बघतो फार उथळ वाटतं मला. तडजोड केलेलं वाटतं कधी पैशांसाठी, कधी भविष्याचा विचार करून, इमोशनल, रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला काहीतरी पाहिजे, असं थोडंसं या पातळीपर्यंत झुकतंय की काय असं कधीतरी वाटतं.
पण मला माहितीये की खरं प्रेम आजही आहे. त्यामुळे करियर आणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे. कारण मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये माझ्यासाठी. ती माझी जीवन पद्धती आहे. प्राजक्ता पुढे म्हणाली, ’म्हणजे कलाक्षेत्रात काम करणं आणि समाजभान बाळगून काहीतरी करणं हे वायरिंग माझ्यात वरूनच आलंय त्याचं मी काही करू शकत नाही. मी एवढे एवढे पैसे कमावेन आणि घरी बसेन असं कधीच नाही होणार.
COMMENTS