पुणे नगर सहयाद्री - भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने व त्याच्या टाेळीतील १० ते १५ गुंडानी हातात काेयते, कुऱ्हाडी, पालघन सारखी घातक शस्त...
पुणे नगर सहयाद्री -
भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने व त्याच्या टाेळीतील १० ते १५ गुंडानी हातात काेयते, कुऱ्हाडी, पालघन सारखी घातक शस्त्रे घेवून २६ फेब्रुवारी राेजी प्रतिस्पर्धी टाेळीतील प्रकाश पवार व त्याच्या चार ते पाच साथीदारांवर प्राणघातक हल्ला करुन जबर जखमी केल्याचा प्रकार घडला हाेता. याप्रकरणात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या नऊ आराेपींना स्वारगेट पाेलीसांनी जेरबंद केले आहे. आतापर्यंत कोयता गँगविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
वृत्त संस्थाच्या माहीती नुसार, टाेळीतील मुख्य आराेपी सचिन माने गुन्हा केल्यापासून पसार झाला हाेता. पाेलीसांना वारंवार गुंगारा देऊन ताे राहण्याची ठिकाणी बदलत हाेता. सचिन माने हा घोरपडे पेठेतील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती (Crime News) तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पाेलीस पथकाने त्याच्यावर पाळत ठेऊन पहाटे दाेन वाजता सचिन माने त्याची स्वत:ची आेळख लपवुन सदर ठिकाणी आल्यावर पाेलीसांनी झडप घालून त्यास कमरेला असलेल्या काेयतासह पहाटे दोनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. परंतु त्यावेळी झटापटीत माने याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले.
सचिन परशुराम माने (वय-२४), विजय प्रमाेद डिखळे (२२), अमर तानाजी जाधव (२३), रमेश दशरथ मॅडम (२०), अजय प्रमाेद डिखळे (२४), राेहित मधुकर जाधव (२७), यश किसन माने (२१),आयुष किसन माने (२१) पल्या पासंगे (२१, सर्व रा.गुलटेकडी,पुणे), सुरज सतिश काकडे (२६,रा.महर्षीनगर,पुणे), निखील पेटकर (२२,रा.बिबवेवाडी,पुणे), अभिषेक पाटाेळे (२२,रा.पर्वती,पुणे), प्रमाेद एस (रा.पर्वती,पुणे) या आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नउ आराेपींना अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पाेलीस आयुक्त रितेश कुमार, सहपाेलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पाेलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, परिमंडळ दाेनच्या पाेलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली, वपाेनि अशाेक इंदलकर, पाेनि साेमनाथ जाधव, एपीआय प्रशांत संदे, पीएसआय अशाेक येवले, पाेलीस हवालदार मुकुंद तारु, पाेलीस अंमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख, दिपक खेंदाड, सुजय पवार, साेमनाथ कांबळे, फिराेज शेख, रमेश चव्हाण, प्रविण गाेडसे, संदीप घुले यांचे पथकाने केली आहे.
COMMENTS