मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सा...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्र राज्याचा आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे.राज्याचे मंत्रीमंडळ अपूर्ण,अर्थसंकल्प मांडणार कोण हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण आसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला आहे. विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्र्याकडून अर्थसंकल्प मांडला जातो.परंतु राज्यात अर्थ राज्यमंत्री पदावर कोणीच नाही.त्यामुळे आज दुपारी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडणार कोण?.मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण आसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला आहे.
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी दीपक केसरकर किंवा शंभूराज देसाई यापैकी एकाला प्राधिकृत केले जाऊ शकते. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्य सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला होता. यामध्ये गेल्या आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ९.१ टक्के इतका असल्याचे नमदू करण्यात आले होते. आगामी काळात राज्यात अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. हा काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुठल्या कुठल्या घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे
COMMENTS