मुंबई । नगर सहयाद्री - देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. राज्याचे सूत्रधार तेच आहेत. राज्य चालवनारे तेच त्यामुळे आ...
मुंबई । नगर सहयाद्री -
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. राज्याचे सूत्रधार तेच आहेत. राज्य चालवनारे तेच त्यामुळे आम्ही त्यांनाच प्रश्न विचारतो. त्यामुळे सर्व सूत्रे फडणवीस यांच्या हातात आहे असा टोला खासदार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारला लगावला आहे. गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र त्यांना गुन्हेगारांचा बचाव करावा लागत आहे.
संजय राऊत म्हणाले, शेतकरी, बेरोजगार रस्त्यावर उतरलाय. राज्य अस्वस्थता आहे. खंडणी, ब्लॅकमेलिंग सुरु आहेत. नाकाने कांदे सोलण्याचे काम सुरु आहे.एका पेक्षा एक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. आम्ही भाजपसारखे कुटुंबापर्यंत जात नाही. आमच्यावर तसे संस्कार नाही. माझ्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत.
संजय राऊत म्हणाले, मी राहुल कूल यांच्या 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण काढले आहे, त्यांची चौकशी करा. ते उपमुख्यंमंत्र्यांचे खासमखास आहेत. कुल यांना कोण वाचवत आहे, त्यावर बोलण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का? लाल वादळ येऊन ठेपले आहे. किती काळ त्यांना रोखणार. अराजकतेची ठिणगी पेटली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल.
देवेंद्रांकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही. ते 5 वर्षे आमच्यासोबत असताना त्यांचा कारभार आम्ही पाहिला आहे. मात्र आता ते तसे राहिले नाही. म्हणूनच 'काय होतास तू काय झालास तु', असे मी म्हटलो. त्यांचे हात दगडाखाली अडकेलेले आहेत. तो काढताही येत नाही आणि ठेवताही येत नाही, अशी फडणवीस यांची अवस्था झाली आहे.
COMMENTS