शिर्डी। नगर सहयाद्री - शेतकरी बांधवांसाठी महापशुधन एक्स्पोच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काही नेत्यांनी तसेच कलाकारांनी देखील ...
शिर्डी। नगर सहयाद्री -
शेतकरी बांधवांसाठी महापशुधन एक्स्पोच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काही नेत्यांनी तसेच कलाकारांनी देखील हजेरी लावली. या निमित्ताने मनोरंजनाचे कार्यक्रमांचे ही आयोजन केले होते. यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि अभिनेता गौरव मोरे हे स्टेजवर उपस्थित होते. सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांनी या कार्यक्रमात 'मैं हूँ डॉन' , 'वन-टू- का फोर' या गाण्यावर डान्स केला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, शिर्डीत पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या कार्यक्रमात खासदार सुजय विखे पाटील यांनी हास्यकलाकार गौरव मोरे यांच्यासोबत वन-टू- का फोर आणि मैं हूँ डॉन गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सुजय विखे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरताच उपस्थितांनी जल्लोष करत त्यांना दाद दिली.
गौरव मोरेने सोशल मीडियावर शिर्डीतील कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये गौरव आणि सुदेश भोसले हे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला गौरवनं कॅप्शन दिलं, शिर्डी महोत्सव 2023 ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढं वय आहे तेवढा अनुभव असलेले सुधेश सर यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो.'
COMMENTS