निघोज | नगर सह्याद्री- इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिक्षण देत ईरा इंटरनॅशनल व ईरा गुरुकुल यांनी शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केल...
निघोज | नगर सह्याद्री-
इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिक्षण देत ईरा इंटरनॅशनल व ईरा गुरुकुल यांनी शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले.
इरा इंटरनॅशनल स्कूल व इरा गुरुकुल विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले. यावेळी स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना प्राचार्य सोनाली सालके यांनी वर्षभर शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, पालकांनी वेळोवेळी शाळेवर विश्वास दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती करू शकलो.
यावेळी प्रियंका लंके यांनी अध्यक्ष सूचना मांडलीस विमल निचीत यांनी अनुमोदन दिले. जागतिक महिला दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नारीशक्ती ही थीम होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, कालिका माता, राधा इत्यादी वर आधारित पात्र केले होते.तसेच भांगडा, देशभक्तीपर गीत, कव्वाली, रिमिस साँग, इत्यादी गाण्यावर आधारित उत्कृष्ट नृत्य सादर केले. माता पालकांसाठी संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जिंकलेल्या महिलेला पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. कोरडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की, शैक्षणिक संस्कृतीला सर्वाधिक महत्त्व आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखाना काढतानाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी उच्च महाविद्यालयांची निर्मीती केली. म्हणून आज विखे पाटील यांच्या माध्यमातून सहकार, शैक्षणिक चळवळीचा समन्वय होउन शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले आहेत.
संदीप सालके व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून ईरा इंटरनॅशनल व ईरा गुरुकुल यामध्ये आज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून अतिशय चांगल्या दर्जाचे शिक्षण या ठिकाणी मिळत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खनसे व छाया सालके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मणियार , जाधव , सोमवंशी , मादनकर ,निकिता , पवार , अश्विनी गोंधळी व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
COMMENTS