मुंबई । नगर सहयाद्री - मुन गोंदिया शहराच्या रामनगर पोलीस ठाणे परिसरातून बातमी समोर आली आहे. हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभ...
मुंबई । नगर सहयाद्री -
मुन गोंदिया शहराच्या रामनगर पोलीस ठाणे परिसरातून बातमी समोर आली आहे. हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेतील एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळून आला आहे. तरुणाच्या गळ्यावर जखमा दिसत असल्याने त्याची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. संदीप भाऊलाल चिखलोंडे (29), रा. चांदणीटोला (नागरी), ता. जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या अधिक माहितीनुसार, शासकीय कृषी महाविद्यालय हिवराजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेत संदीप चिखलोंडे याचा मृतदेह झाडाला लटकलेला स्थितित होता. सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या लोकांनी हे पाहिल्यावर तरुणाने आत्महत्या केली असे काहींना वाटले. उमेश ओमकार माहुले, रा. हिवरा याने पोलिस पाटील विनोद नंदेश्वर यांना सदर घटनेची माहिती दिली.
नंदेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता वन विभागाच्या मोकळ्या जागेत एका झाडाला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संदीप चिखलोंडे याच्या मानेवर धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करण्यात आला.
मफलरसारख्या कपड्याने बांधून झाडाला लटकवले. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागोजागी रक्ताचा सडा पडला होता. संदीपचा खून करणारे ओळखीचेच असावेत असा कयास लावला जात आहे. यासाठी रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस एकत्र येत आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. आरोपी सापडल्यानंतरच या खून प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
COMMENTS