अहमदनगर | नगर सह्याद्री युवतीच्या घरी जावून तिच्यासोबत गैरवर्तन करत जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला. २४ मार्चला बोल्हेगाव उप...
अहमदनगर | नगर सह्याद्री
युवतीच्या घरी जावून तिच्यासोबत गैरवर्तन करत जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न एका तरूणाने केला. २४ मार्चला बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रेयश राजेंद्र मिरपगार (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिची श्रेयशसोबत ओळख आहे. तो २४ मार्चला सकाळी युवतीच्या घरी गेला व तिला आवाज दिला. युवती घराच्या बाहेर आल्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. ‘तू माझे फोन का उचलत नाही. मला का बोलत नाही, मला तुला बोलायचे आहे, तु माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, माझ्या दुचाकीवर बस आपण फिरायला जावू’, असे म्हणून हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
युवती त्याला म्हणाली, ‘माझे लग्न जमले आहे, तु मला पुन्हा भेटू नकोस’, असे म्हणताच त्याने तिला लग्न मोडून टाकण्याची धमकी दिली. तसेच होणार्या पतीच्या मोबाईलवर संपर्क करून तिची बदनामी केल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS