नवी दिल्ली | वृत्तसंस्था- केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. काल, शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घ...
नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. काल, शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) बंपर वाढ केली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवून ४२ टक्क्यांवर नेला आहे, यासोबत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरिअर देखील मिळणार आहे. DA वाढीसाठी सरकार १२,८१५ कोटी रुपये खर्च करणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार,सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. महागाई भत्त्यासोबतच केंद्रीय पेन्शनधारकांना DR म्हणजेच महागाई सवलतीचा लाभ मिळेल. या दरवाढीनंतर पेन्शनधारकांना ३८% ऐवजी ४२% महागाई सवलत मिळेल. केंद्र सरकारने १ जानेवारी २०२३ पासून त्याची अंमलबजावणी केली. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीची थकबाकी मार्च महिन्याच्या पगार वाढीसह मिळेल.
पगारानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ पगार-१८००० रुपये आहे, तर त्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के अर्थात ६,८४० रुपये इतका आहे. आता तोच महागाई भत्ता ४२ टक्के झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ७,५६० रुपये इतका झाला आहे.
कमाल मूळ वेतनाच्या बाबती बघितलं तर ५६,००० रुपयांवर महागाई भत्ता २१,२८० इतका आहे. तर आता चार टक्के महागाई भत्ता वाढल्याने आता महागाई भत्ता २३,५२० रुपये इतका होणार आहे. तर किमान वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना ७२० रुपये मिळणार आहे, त्यामुळे त्यांना वार्षिक ८,६४० रुपये मिळणार आहे.
COMMENTS