अहमदनगर | नगर सह्याद्री- राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू.श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांती...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
राष्ट्रसंत आचार्य सम्राट पू.श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित भक्तिसंध्या सोहळा सोमवार दि.२० मार्च २०२३ ला सायंकाळी ७ वाजता आनंदधाममध्ये रंगणार आहे. आघाडीच्या गायिका सृष्टी जगताप हिच्या सुमधूर स्वरातील गुरूभक्ती व प्रभूभक्तीची भावपूर्ण गीते रसिक भाविकांना प्रथमच आनंदधाममध्ये ऐकावयास मिळणार आहेत. याचवेळी खुल्या समूह भक्तिगीत स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
कु.सृष्टी जगताप ही महाराष्ट्रातील आघाडीची गायिका मुंबईतील गोरेगांव येथील पाटकर महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकते आहे. पंडित अजॉय चक्रवर्ती यांच्याकडे ती शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. तिची आई डॉ. श्रध्दा जगताप आणि पृथ्वी गंधर्वजी (मुंबई) यांच्याकडून गजल व संगीतशास्त्राचेही शिक्षण घेत आहे. मुंबईतील पार्श्वगायक क्षितीज तारे यांच्याकडून तिने पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत.
खुल्या संगीत स्पर्धा आणि शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक मानाची बक्षिसे पटकाविलेल्या कु. सृष्टी जगताप हिने लता अलंकरण राज्यस्तरीय संगीत स्पर्धेच्या ज्युनियर विभागात प्रथम पारितोषिक मिळविले. सृष्टी जगताप ही नवगायिका नगरमध्ये प्रथमच येत असून तिच्या उपस्थितीत होणारी भक्तिसंध्या ही भाविकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
आनंदऋषीजी महाराज यांच्या ३१ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जैन सोशल फेडरेशन व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ मार्च या दोन्हीही दिवशी आनंदधाममध्ये सायंकाळी ७ वाजता खुल्या समूह भक्तिगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा बक्षिस वितरण समारंभ दि.२० मार्चला भक्तिसंध्या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
COMMENTS