नाशिक। नगर सहयाद्री - नाशिक शहरातील खून आणि हल्ल्याच्या घटना लागोपाठ घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. देवळाली कॅम्प परिसरात तरूणावर ...
नाशिक। नगर सहयाद्री -
नाशिक शहरातील खून आणि हल्ल्याच्या घटना लागोपाठ घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. देवळाली कॅम्प परिसरात तरूणावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण आठ जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल असून संशयित आरोपी सध्या फरार आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, साहिल संतोष वायदंडमे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवळाली कॅम्प परिसरात राहणारा साहिल संतोष वायदंडमे या तरुणावर धुळवडीच्या दिवशी मित्रांनी जुन्या वादाचा काटा काढण्यासाठी हल्ला केल्याची माहिती समोर अली आहे. साहिल च्या डोक्यावर धारधार शस्राने वार केल्याने त्यात तो गंभीर जखमी असून त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
साहिल संतोष वायदंडमे याच्यावर हल्ला करणारे गणेश उमाप, करण उमाप, गबऱ्या रोकडे, शाम दोदे, मधुकर दोंदे, आशू ऊर्फ नण्या दोदे, वंशिता दोंदे यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली कॅम्प पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
COMMENTS