मुंबई। नगर सहयाद्री - विधानसभा निवडणुकीत नाट्यमयरित्या पराभवाला सामोरे गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता आता थेट पंतप्रधान पदावर दा...
मुंबई। नगर सहयाद्री -
विधानसभा निवडणुकीत नाट्यमयरित्या पराभवाला सामोरे गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता आता थेट पंतप्रधान पदावर दावा केल्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्ती केली.देशाची स्त्री पंतप्रधान झाली, तर तुमची ताई होऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. त्यासाठी तुम्ही एकजुटीने साथ द्या, असे आवाहनही केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माणसांसाठी काम करणे हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्या संस्कारावर चालणारी तुमची ताई आहे. ताईमध्ये काही खोट असेल तर सांगा, नको बाबा. ताईचे नाव नको वाटते घ्यायला. लाजच वाटते. आम्हाला पंकजा ताईंच्या गावाचे आहोत, असे सांगायला लाज वाटते. असे काही वाटते का? कुठे बाहेर गेल्यावर काय सांगता. मुंडे साहेबांच्या गावाचे. ताईंच्या गावचे, असा सवाल त्यांनी केला.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, माझ्याकडून काही चुकले का, माझ्यात काही खोट आहे का. माझ्याकडून कुणाचे नुकसान झाले आहे, पाप झाले आहे? काही नाही. साहेबांच्या काळात एवढा निधी आला, तर लोक म्हणायचे खालचे बोगसच काम करायचे. आता एवढा निधी देऊन विकास करू शकत नाही. आता देशाची पंतप्रधान स्त्री झाली, तर तुमची लेक होऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा होत्या. त्यानंतर त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन ठाकरे गटाच्या आमदाराने केले होते. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत आहे. मात्र, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य करत आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना ही ऑफर दिली होती.
COMMENTS