अहमदनगर | नगर सह्याद्री रात्रीच्या वेळी घराबाहेर येवून जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करून दगडफेक करणार्या ११ ते १२ जणांविरूद्ध अॅट्रोस...
अहमदनगर | नगर सह्याद्री
रात्रीच्या वेळी घराबाहेर येवून जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करून दगडफेक करणार्या ११ ते १२ जणांविरूद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सव्वानऊनंतर केडगाव उपनगरातील मोहिनीनगरमध्ये ही घटना घडली. प्रफुल्ला नितीन कांबळे (वय २०) यांनी फिर्याद दिली आहे.
अजिंय ऊर्फ बाल्या कोतकर (रा. चांगदेव मळा, केडगाव), प्रदीप आव्हाड, अभिजीत गावडे, किशोर आरणे, भागवत आव्हाड (सर्व रा. दूधसागर सोसायटी, केडगाव), करण गौंड, प्रतिक तापकीर (सर्व रा. केडगाव) व इतर चार ते पाच अनोळखीविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी रात्री फिर्यादी व त्यांचे कुटूंब घरी असताना प्रदीप आव्हाड व इतर हातात लाकडी दांडके व रॉड घेवून आले. त्यांनी फिर्यादीसह त्यांच्या आई व आजीला जातीवाचक शिवीगाळ करून घरावर दगडफेक केली. प्रदीपने फिर्यादीला धक्काबुक्की करून, तुझे भाऊ व वडिल घराच्या बाहेर कसे निघतात ते पाहतो’, अशी धमकी दिली.
COMMENTS