पुणे। नगर सहयाद्री - खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ह...
पुणे। नगर सहयाद्री -
खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आतापर्यत गौतमी पाटीलचे जेवढे नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही ना काही नवीनच घडल्याच दिसत आहे. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, सबसे कातील गौतमी पाटीलची गोष्टच वेगळी आहे. जिथं गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम तिथे तरुणाईची मोठी गर्दी आणि राडा असे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र खेडमधील गौतमीचा कार्यक्रम कोणत्याही मोठ्या घटनेशिवाय पार पडला. यावेळी तरुणाईसह महिला, तरुणी, चिमुकल्यांनीही गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
खेड तालुक्यातील मोहितेवाडी येते गावच्या यात्रा उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलला समोर डान्स करताना पाहून उपस्थित प्रेक्षकांमधील तरुणाई आणि लहान मुलं देखील जाग्यावर उभे राहून डान्स करू लागले. हे पाहून गौतमीने या चिमुकल्यांना थेट स्टेजवर बोलवले आणि त्यांच्यासोबत डान्स केला आणि त्याची गालावर किस केलं. आता गौतमीचं चिमुकल्यांसोबतचं हे वर्तन चर्चेत आलं आहे. खेडमधील हा कार्यक्रम देखील चर्चेत आला आहे.
COMMENTS