नाशिकच्या द्वारका चौकात दिव्यांग महिलेस सिटीलिंक बसने जोरदार धडक दिली. नाशिक / नगर सहयाद्री - नाशिकमधील द्वारका चौकात दिव्यांग महिलेस सिटी ब...
नाशिकच्या द्वारका चौकात दिव्यांग महिलेस सिटीलिंक बसने जोरदार धडक दिली.
नाशिक / नगर सहयाद्री -
नाशिकमधील द्वारका चौकात दिव्यांग महिलेस सिटी बसने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. अक्षरशः या धडकेत महिलेला लांबवर फरफटत नेलं यात त्या दिव्यांग महिलेला गंभीर जखम झाली आहे. महिलेस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेखा सकट असे जखमी दिव्यांग महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,महिला द्वारका चौकातून पायी रस्ता ओलांडत असताना आडगाव नाक्याकडून द्वारकाच्या दिशेने येणाऱ्या सिटी बसने त्यांना जोरदार धडक दिली.या अपघातात दिव्यांग महिला लांबवर फरफटत गेली. डोळ्यासमोर हा अपघात घडताना पहताच चौकातील नागरिकांनी आरडा ओरड केल्यानंतर बस चालकाने बस थांबविल्याने सुदैवाने महिला बचावली.
महिलेची परिस्थिती बघता चौकातील अनधिकृत रिक्षा थांब्यावर थांबलेल्या प्रत्येक रिक्षा चालकास महिलेस रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. प्रत्येकाने नकार दिला. शेवटी पोलिसांनी खिशातून पैसे काढत रिक्षा चालकास देत महिलेस रुग्णालयास घेऊन जाण्यास सांगितले. तरीदेखील त्यांनी नकार दिला. त्यांच्या या असंवेदनशीलतेने माणुसकीला काळीमा फासणारी वृत्ती समोर आली आहे.
परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत येथील अनधिकृत रिक्षा थांबा हलविण्यात यावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या अनाधिकृत रिक्षा थांबल्यामुळे चौकात अधिक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन अपघातहोत असल्याचे सांगितले जाते आहे. शेवटी काही वेळानंतर रुग्णवाहिका आल्यांनतर महिलेस उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
COMMENTS