अहमदनगर | नगर सह्याद्री- अहमदनगरचे नाव शाहशरीफनगर करावे अशी मागणी एम. आय. एम. ने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निव...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अहमदनगरचे नाव शाहशरीफनगर करावे अशी मागणी एम. आय. एम. ने महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगरचे नाव बदलण्याबाबतचे राजकारण सध्या सुरू आहे.या विषयाबाबत जनतेची एकजूट न बिघडता शहराचे नाव शाहशरीफनगर असावे अशी आमची स्पष्ट भुमिका आहे. अहमदनगर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऋणानुबंध अत्यंत जुना आहे. त्यांचे पूर्वज मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, शरीफजी राजे भोसले या सर्वजणांची कारकिर्द याच शहरात बहरली. त्यांनी येथे अनेक पराक्रम केले.१६२४ सालची भातोडीची लढाई जगप्रसिध्द आहे.
शहराजवळील भातोडी पारगाव येथे ही लढाई झालेली होती. या लढाईमधे शिवरायांचे वडिल शहाजीराजे यांनी फार मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांनी गनिमी कावा वापरून भातोडीचा तलाव फोडला व शत्रूसैन्याला हरवले होते. या लढाई नंतर शहाजीराजेंना ’सरलष्कर’ हा किताब दिला गेला होता. याच लढाईत त्यांचे बंधु व शिवरायांचे चुलते शरीफजीराजे हे शहीद झाले. त्यांची समाधी आजही भातोडी या गावी आहे. शिवरायांच्या पुर्वजांचा पराक्रम आपण सर्वांनी ध्यानात ठेवला पाहिजे. त्याला सलाम केला पाहिजे.
शिवरायांचे पुर्वज शहाजीराजे व शरीफजी राजे यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे.यासाठी मनपाच्या येत्या सभेमधे ’शाहाशरीफनगर’ नाव देण्याबाबतचा ठराव अजेंड्यावर घेऊन तो सर्वानुमते मंजूर करावा.यावेळी एम.आय.एम. जिल्हाध्यक्ष डॉ.परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, कार्याध्यक्ष मतीन शेख, शहर विद्यार्थी अध्यक्ष सनाउल्ल्हा तांबटकर, इमरान शेख आदी उपस्थित होते.
COMMENTS