मुंबई / नगर सहयाद्री - चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाण...
मुंबई / नगर सहयाद्री -
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेला. कामावरून आल्यनंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. नालासोपारा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रभु विश्वकर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. तर अनिता विश्वकर्मा असे मयत पत्नीचे नाव आहे. सात वर्षापूर्वी यांचा विवाह झाला होता. दोघे नालासोपारा येथे राहत होते. प्रभु याला पत्नी अनिताचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
तिने आपले कोणासोबतही अनैतिक संबंध नसल्याचे सांगितले. तो वारंवार अनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. रविवारी रात्रीही दोघांमध्ये नेहमीप्रमाणे वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की, विकोपाला गेला की प्रभुने अनिताचा गळा आवळून तिला संपवले.
रात्री पत्नीची हत्या केली. मग सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेला. दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन संध्याकाळी घरी परतला. पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
COMMENTS