पारनेर | नगर सह्याद्री राज्य सरकारी कर्मचार्यांना भरमसाठ पगार असतानाही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करण्यात आले. त्यांचा अट्टाहास कायम अस...
राज्य सरकारी कर्मचार्यांना भरमसाठ पगार असतानाही जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करण्यात आले. त्यांचा अट्टाहास कायम असेल तर सुशिक्षित युवक, युवती शासकीय कर्मचार्यांच्या जागी अर्ध्या पगारात आणि विना पेन्शन काम करण्यास तयार आहेत, असे पत्र बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना दिले आहे.
हे निवेदन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदनावर पारनेरचे अक्षय औटी, गोपी काळभोर, योगेश बुगे, मयूर चौरे, राहुल बुगे, वैभव मंदिलकर, राहुल चौरे, अनिकेत साबळे, अभी खोडदे, जुनेद राजे आदींसह सुशिक्षित बेरोजगारांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले की, लाखो युवक, युवती बेरोजगार आहेत. सरकारी कर्मचार्यांना भरघोस पगार असूनही त्यानी शासनाला वेठीस धरले आहे. त्यांना मिळणार्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. त्यांच्या आंदोलनाने लोकांना वेठीस धरले आहे. जुनी पेन्शन चालू केल्यास सुशिक्षित बेरोजगारांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पारनेर शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी दिला आहे.
COMMENTS