निघोज | नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- कोहकडी (ता. पारनेर) येथे वार्षि...
निघोज | नगर सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- कोहकडी (ता. पारनेर) येथे वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या कलागुणांचा आविष्कार उत्साहात झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, दौंड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,शिक्षण उपनिरीक्षक श्रीराम थोरात, शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे,सुदामराव पवार, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संचालक कारभारी बाबर,सूर्यकांत काळे, सचिव संतोष मगर, विश्वस्त प्रल्हाद भालेकर, सरपंच सीमाताई पवार, चेअरमन मच्छिंद्र चौधरी, समितीचे अध्यक्ष संजय झरेकर यांच्या हस्ते झाले. समीक्षा टोणगे व आर्या कौटकर, मयूर झरेकर यांचा गौरव करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, बाळकृष्ण कळमकर, श्रीराम थोरात व सुदामराव पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आबासाहेब दळवी, सुयोग पवार, रवींद्र रोकडे, अनिल जाधव, गौतम साळवे, रामकृष्ण मेहेत्रे, अशोक कळमकर, अनिल इकडे, अशोक काकडे, संतोष स ाबळे, रमेश पावडे, बाळासाहेब दिघे, गणेश कोहकडे, बाळासाहेब रासकर, सुभाष लाळगे, बाजीराव पाचारणे, रझिया मनियार, माजी सरपंच लहानू टोणगे, जयवंतराव गायकवाड, उपसरपंच सुनिता जांभळकर, माजी उपसरपंच जालिंदर झरेकर, विठ्ठल चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक गोकुळ कळमकर, संजय ओहळ, सचिन परांडे यांनी केले. मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे, राजेंद्र वाबळे, संतोष गाजरे, गोकुळ कळमकर, शिक्षिका आशा आननकर, उज्ज्वला काळे उपस्थित होते.
COMMENTS