श्रीगोंदा | नगर सह्याद्री चालत्या रेल्वेतुन पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तालुयातील श्रीगोंदा कारखाना रेल्वे फाटकाजवळ घडली. अर...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
चालत्या रेल्वेतुन पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना तालुयातील श्रीगोंदा कारखाना रेल्वे फाटकाजवळ घडली. अर्जुनसिंग सरबतसिंग टाक(वय-२९, रा. हडपसर, जि. पुणे) व दिनेश विजय पवार (वय-२८, रा. गंजपेठ, जि. पुणे) अशी मयतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेटमन बाळासाहेब छगन कांडेकर हे तालुयातील श्रीगोंदा कारखाना फाटकावर कर्तव्य बजावत होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास कांडेकर यांना दोन तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध पडल्याचे दिसले. रेल्वे गेल्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते दोन्ही मयत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कांडेकर यांनी रेल्वे स्थानक प्रमुखांना ही माहिती दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.मयतांच्या कुटुंबियांशी संपर्क होऊन ओळख पटली. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
COMMENTS