मुंबई। नगर सहयाद्री - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याचं प्रकरण समोर आले होते. बुकी अनिल जयसिंघानीला...
मुंबई। नगर सहयाद्री -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याचं प्रकरण समोर आले होते. बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात अनिक्षा जयसिंघानीचे नाव समोर आल्यानंतर तिचे वडिल आणि बुकी अनिल जयसिंघानी यांचेही नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली होती की, अनिक्षाने तिला एक कोटी रुपयांची लाच देऊ केली होती.या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. थोड्यावेळात अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
COMMENTS