सांगली। नगर सहयाद्री- सांगलीत जतचे भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची गाडी अडवून अज्ञात आरोपींनी ...
सांगलीत जतचे भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची गाडी अडवून अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल जवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवर असणाऱ्या अल्फान्सो स्कूल येथे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते.
अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची इनोव्हा गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ताड जागीच ठार झाले आहेत..गोळीबार झाल्यानंतर ताड खाली उतरत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे.सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.
COMMENTS