मुंबई। नगर सहयाद्री - मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलिवूड चित्रपटांवरही...
मुंबई। नगर सहयाद्री -
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलिवूड चित्रपटांवरही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पूजाचा ‘दगडी चाळ २’ हा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. पूजा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यात व्यग्र आहे. मात्र काम करत असताना तिला आजारपणाचा सामना करावा लागत आहे.
कामाबाबत असो वा खासगी आयुष्याबाबत पूजा प्रत्येक माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोचवते. आताही गेले दोन दिवस ती विविध पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे पूजा सध्या घरीच आहे. तिला शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली होती.
COMMENTS