पारनेर | नगर सह्याद्री पारनेर शहरातील पारनेर अळकुटी रस्त्यावरील चेडे मळ्यात रविवारी रात्री किराणा मालाचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरटयांनी सुमार...
पारनेर शहरातील पारनेर अळकुटी रस्त्यावरील चेडे मळ्यात रविवारी रात्री किराणा मालाचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे एक लाखांचा ऐवज चोरून नेला. त्यात ४५ खाद्य तेलाचे डबे तसेच चिल्लरचा समावेश आहे.
शहरामध्ये चेडे मळयात रामदास भिमाजी चेडे यांची अळकुटी रस्त्यावर श्रीराम एंटरप्राईजेस या नावाची फर्म आहे. तालुयातील दुकानदारांना विविध प्रकारचा किराणा माल ठोक दराने पोहच करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. चेडे मळयात पत्र्याच्या गोडाऊनमध्ये मालाचा साठा करण्यात येऊन तेथून तालुयाच्या विविध भागामध्ये किराणा माल नियमित पोहच करण्यात येतो. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत रामदास चेडे व त्यांच्या सहकार्यांनी सोमवारी वितरीत करायचा माल वाहनामध्ये भरून गोडाऊन बंद करून ते घरी गेले. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रामदास चेडे यांचे बंधू लक्ष्मण देखील गोडाऊनपासूनच त्यांच्या घरी गेले. त्यानंतर चोरटयांनी मध्यरात्रीनंतर गोडाऊनच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. रविवारीच चेडे यांच्याकडे ३५ तेलाचे डबे आले होते. हे डबे ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, नेमया त्याच ठिकाणचा पत्रा उचकटण्यात आला. आत प्रवेश करून ३५ डब्यांसह पुर्वीचे दहा डबे चोरटयांनी लांबविले. तसेच ड्रावर मध्ये ठेवण्यात आलेली चिल्लरही त्यांनी लांबविली. गोडाऊनपासुन जवळच असलेल्या बाभळीच्या झाडाखाली वाहन लाउन त्यातून तेल डबे लांबविण्यात आले. सकाळी रामदास चेडे हे गोडाउनमध्ये बांधलेले कुत्र्याचे पिल्लू सोडण्यासाठी शटर उघडून गोडाऊनमध्ये गेले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना त्याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. श्वान पथक तसेच ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले.गोडाऊनमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरटयांनी तेथील बिस्कीटे, कॅडबरीवर ताव मारीत अतिशय निवांतपणे तेथील माल लांबविला. गोडाऊनमधील कमी किंमतीच्या मालास मात्र त्यांनी हात लावला नाही. दरम्यान, चेडे यांनी वाहनामध्ये बराच माल भरून ठेवल्याने तसेच काही किमती माल शेजाराच्या गोडाऊनमध्ये असल्याने चेडे यांचे मोठे नुकसान टळले.
चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर लांबविला
चेडे यांनी सुरक्षितेच्या हेतूने गोडाऊन व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. चोरटयांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पाठीमागच्या बाजूस असलेला सीसीटीव्ही कॅमेर्याची दिशा काठीच्या मदतीने आकाशाकडे केली जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद होणार नाहीत याची काळजी घेतली. जाताना सीसीटीव्हीचे चित्रण संकलीत करणारा डिव्हीआरही चोरटे घेउन गेले तर दुसरीकडे कोणी पाहू नये म्हणून चोरटयांनी अंधारात बाभळीच्या झाडाखाली वाहन लाऊन शेजारील मकाच्या शेतामधून डबे वाहून नेण्यासाठी पायवाट तयार केली. कोणालाही संशय येऊ नये याची काळजी घेत अतिशय नियोजनबध्द पध्दतीने ही चोरी केली.
COMMENTS