राहुल शिंदेंचा तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेंना सवाल: संचालक रिक्त जागेचा अधिकार तर अध्यक्षांचा पारनेर | नगर सह्याद्री जिल्हा सहकारी बँकेच्या रि...
राहुल शिंदेंचा तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेंना सवाल: संचालक रिक्त जागेचा अधिकार तर अध्यक्षांचा
पारनेर | नगर सह्याद्री
जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त संचालक जागेचा अजेंडा काढण्याचा अधिकार सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना असून गीतांजली शेळकेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार राष्ट्रवादीला दिला कोणी? असा सवाल भाजपाचे नेते राहुल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
दिवंगत सॉलिसीटर गुलाबराव शेळके व अॅड उदय शेळके यांचे सहकारातील योगदान हे महाराष्ट्र सह जिल्ह्याला माहित असुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे रिक्त संचालक जागेचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपले अज्ञान उघड न करता जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असून गीतांजली शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार दिला कुणी? राष्ट्रवादीचे नेते राहुल शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांना केला आहे. तर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत उदय शेळके यांची विरोधात भाजपने कुठलाही आपला उमेदवार दिला नव्हता तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्या शिवसेना पक्षाने उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांना जिल्हा सहकारी बँकेत उदय शेळके यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. या उमेदवारीशी भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नसून आम्ही कोणताही उमेदवार जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत दिला नसल्याचे ही राहुल शिंदे यांनी सांगितले. सध्या जिल्हा सहकारी बँकेमध्ये भाजपकडे बहुमत असून भाजपकडे १० संचालक तर राष्ट्रवादीचे ९ संचालक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून काही कारणाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी त्या कुटुंबातील सदस्यांना संधी देण्याची परंपरा जिल्हा सहकारी बँकेने जोपासली आहे. सहकारी विभागाकडून या रिक्त जागेची परवानगी मिळाल्यानंतर यासंबंधी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या व संचालक मंडळाच्या निर्णयाने या रिक्त जागेची निवड केली जाते. असे असतानाही पारनेर तालुयातील राष्ट्रवादीचे नेते मात्र अकलेची तारे तोडत असून हा वाद निर्माण करून त्यांना काय साध्य करायचे आहे असा सवालही भाजपचे नेते राहुल शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पारनेर तालुयाचे सहकार क्षेत्रातील वैभव असलेले आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन असलेले स्व. उदयराव शेळके आणि स्व. गुलाबराव शेळके यांनी पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्रात महानगर बैंक, मुंबई जिल्हा बँक, राज्य सहकारी बैंक या माध्यमातून सहकार आणि आर्थिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे काम उभे केलेले आहे. परंतु स्व. उदयराव शेळके आणि.स्व. गुलाबराव शेळके या दोन्ही नेत्यांच्या अकाली निधनामुळे सध्या पारनेर तालुयाचे पारनेर तालुयाचे सोसायटी मतदार संघातील जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व रिक्त झाले आहे. शेळके पिता पुत्रांचे पारनेर तालुयातील सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेता जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. उदयराव शेळके यांच्या पत्नी श्रीमती गीताजली उदयराव शेळके यांचीच रिक्त झालेल्या सोसायटी मतदार संघातील संचालक पदी नियुक्ती झाली पाहिजे अशी आग्रही मागणी राहुल शिंदे यांनी सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सोसायटीमध्ये पराभव झालेल्यांनी जिल्हा बँकेवर बोलू नये: उपसरपंच अप्पा रोहकले
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी आपली राजकीय उंची पाहूनच जिल्हा सहकारी बँक विषयी भाष्य केले पाहिजे. कारण भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये ज्यांचा पराभव झाला व ज्यांना एकही संचालक निवडून आणता आला नाही त्यांनी जिल्हा सहकारी बँक विषयी बोलण्याची उंची नाही अशी टीका भाळवणीचे उपसरपंच आप्पा बबन रोहकले यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांच्या बुद्धीची किव येत असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करताना आपले अज्ञान उघड होणार नाही याची पण काळजी घ्यावी असा सल्ला उपसरपंच आप्पा रोहकले दिला आहे.
लोकप्रतिनिधींनी शेळकेंचा सत्कार
केला का? : राहुल शिंदेंचा सवाल
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून जिल्हा बँक ओळखली जाते या जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी अॅड. उदय शेळके यांची निवड झाल्यानंतर तालुयातील लोकप्रतिनिधी त्यांचा कधी सत्कार केला का असा सवाल भाजपाचे राहुल शिंदे यांनी केला आहे.
COMMENTS