मुंबई। नगर सहयाद्री - जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. मुख्यम...
मुंबई। नगर सहयाद्री -
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीनंतर जून्या पेन्शन योजनेचा तिढा सुटला असून शासकीय कर्मचाऱ्यांनी गत सात दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेतला आहे. आताच याबाबत संघटनेचे नेते विश्वास काटकर यांनी स्पष्टोक्ती दिली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मागील सात दिवसांपासून संपामुळे शिक्षण, रुग्णालय, महाविद्यालय, नगर पालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसील कार्यालय यांसह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होते. संपामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील रखडले आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असल्याचं सुकाणू समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे. ही चर्चा यशस्वी झाली आहे. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात गंभीरपणे विचार करत आहोत. या विषयाची माहिती मिळवण्यासाठी समिती नेमली आहे, असं सरकारने म्हटलं आहे.
संघटनेचे नेते विश्वास काटकर म्हणाले, आमची मुळ मागणी जुनी पेन्शन योजनेची मागणी होती. शासनाने यासंबंधी वेगवेगळी कार्यवाही केली त्यानंतर आज शासनाने स्पष्ट केले की, यासंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत. त्यात समिती स्थापन केली जाईल. जुनी पेन्शन योजनेबाबतची भूमिका आम्ही स्वीकारली आहे असेही संघटनेते नेते विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले.
विश्वास काटकर म्हणाले,जुन्या पेन्शनमुळे नव्या पेन्शनची तुलना करताना मोठे आर्थिक अंतर होते हे अंतर नष्ट करून नवी पेन्शन यापुढे आली तरी सर्वांना समान निवृत्ती वेतन मिळेल त्यात अंतर राहणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊ असेही शासनाने आश्वासन दिले. जुनी पेन्शन योजना यापुढे सुरू होईल व ती निकोप असेल.विश्वास काटकर म्हणाले, संपाचा जो परिणाम झाला. त्यातून शासन दरबारी पडसाद पडले. त्यातून आमची शासनासोबत आज बैठक झाली त्यात जी चर्चा झाली ती यशस्वी झाली.
संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारने पाठवलेल्या नोटीसा मागे घेणार असल्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावं. सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असं आवाहनही काटकर यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.
COMMENTS