नागपूर। नगर सहयाद्री - नागपुरातील मिनीमातानगर पतीने चारित्र्यावर संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करत पत्नीची हत्या केल्याची घटन...
नागपूर। नगर सहयाद्री -
नागपुरातील मिनीमातानगर पतीने चारित्र्यावर संशयावरून पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करत पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून, ललिता या ब्युटी पार्लरमध्ये काम करायच्या.अमर हा पत्नी ललिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरूहोता दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहतात. ललिता या दोन मुलींचा सांभाळ करायच्या. मंगळवारी दुपारी नळ फिटिंग करणारा युवक कामानिमित्त ललिता यांच्याकडे आला. याबाबत अमरला कळताच त्याने ललिता यांच्याशी वाद घातला. ललिता यांनी कळमना पोलिस स्टेशनमध्ये अमरविरूद्ध तक्रार दिली.घरी परतल्या.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास अमरने पुन्हा ललिता यांच्याशी वाद घातला.अमरने हतोड्याने ललितांच्या डोक्यावर वार केले. ललिता यांनी आरडाओरड केली. त्यांच्या मुली तळमजल्यावरील खोलीत आल्या. तोपर्यंत ललिता यांचा मृत्यू झाला होता. मुलींना डोळ्यासमोर दृश्य पाहून रडायला सुरूवात केली. शेजारी जमले. तत्पूर्वी अमर हा कळमना पोलिस ठाणे गाठून हजर झाला.पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अमरला अटक केली.
COMMENTS