पुणे। नगर सहयाद्री - काही महिन्यांपूर्वी सेक्सटॉर्शनच्या घटनेने पुणे हादरलं होतं. या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने या घटन...
पुणे। नगर सहयाद्री -
काही महिन्यांपूर्वी सेक्सटॉर्शनच्या घटनेने पुणे हादरलं होतं. या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने या घटनेचा खुलासा झाला. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये ६४ वर्षीय वृद्धाची तब्बल ४ लाखांची फसवणूक झाली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, पुणे शहरामधून एक धक्कादायक घटना समोर अली आहे. ६५ वर्षीय वृद्ध आजोबांना अज्ञात महिलेने व्हिडिओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा कॉल व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मॉडेल कॉलनीतील गोखलेनगरमधील एका ६४ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नुसार, वृद्ध आजोबा नेहमी प्रमाणे त्यांच्या घरी असताना एका अज्ञात तरुणीने त्यांना व्हॉटसअॅपवर मॅसेज केले त्यानंतर व्हिडिओ कॉल करण्यास सुरवात केली. तसेच त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. हा संपूर्ण कॉल सुरू असतानाच त्याचे स्क्रिन रेकॉर्डिंग करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.
आणखी एका आरोपीकडून पोलिस असल्याचे सांगत धमकावण्यात आले. तसेच हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ४ लाख ६६ हजारांची रक्कम घेण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पुण्याच्या चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS