नवी दिल्ली वृत्तसंस्था- प्रियकराने प्रेयसीला भेटायला बोलावून तिच्यावर गोळी झाडल्याची धक्कदायक घटना गाझियबादमध्ये घडली आहे. पीडित प्रेयसी ही ...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
प्रियकराने प्रेयसीला भेटायला बोलावून तिच्यावर गोळी झाडल्याची धक्कदायक घटना गाझियबादमध्ये घडली आहे. पीडित प्रेयसी ही विवाहित आहे. तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र नंतर तिने प्रियकरासोबत दुरावा निर्माण केला. याच रागातून त्याने हे कृत्य केले. गोळीबारात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता दोघेही लग्नसमारंभात जेवण बनवण्याचे काम करायचे. तेथेच त्यांची ओळख झाली आणि दोघे प्रेमात पडले. मग दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. काही दिवसांनी अचानक प्रेयसीने भेटणे बंद केले. वेळोवेळी बोलवून प्रेयसीने टाळाटाळ केली. मात्र आरोपी सतत महिलेचा पाठलाग करायचा आणि तिला आपल्याकडे येण्यास सांगायचा.
आरोपीने मंगळवारी प्रेयसीला भेटायला बोलावले. यानंतर तिच्यावर गोळी झाडली. यात महिला गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली. गोळीबारानंतर आरोपी तेथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर आहे.सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
COMMENTS