मुंबई। नगर सहयाद्री - आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्ण...
मुंबई। नगर सहयाद्री -
आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित झाले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरू आहे. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित झाले आहेत. सामना सुरु होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बनीज यांनी एका विशिष्ट प्रकारच्या रथात बसून पूर्ण मैदानाची प्रदक्षिणा घातली.
मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना हात दाखवून अभिवादन देखील केले.नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे.तर ऑस्ट्रेलिया बरोबरीत आणण्याची संधी असणार आहे.
COMMENTS