अहमदनगर | नगर सह्याद्री- सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिमानी विरेंद्र शेकटकर (रा. ...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
सासरच्या लोकांनी शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिमानी विरेंद्र शेकटकर (रा. चितळे रोड, नगर) असे विवाहितेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी मयत हिमानीची आई अलका संजय भंडारे (वय ५३ रा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पती विरेंद्र अशोकराव शेकटकर, सासरे अशोकराव शेकटकर, सासू सुरेखा अशोकराव शेकटकर (तिघे रा. चितळे रोड, नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिमानीचा विवाह मे २०१२ मध्ये वीरेंद्र शेकटकरसोबत झाला होता. पती, सासरे आशोकराव शेकटकर, सासू सुरेखा आशोकराव शेकटकर, दीर निरज आशोकराव शेकटकर असे एकत्र कुटुंबासह राहत होते. मे २०१२ पासुन पुढे दोन वर्षे फिर्यादीच्या मुलीच्या सासरच्या लोकांनी मुलीला व्यवस्थित नांदवले.
त्यानंतर पतीसह सासू सासरे तिला सतत शारीरीक व मानसिक त्रास देऊन आमची बदनामी करते असे म्हणून उपाशी ठेवून छळ करू लागलेफ, याबाबत हिमानी वेळोवेळी तिच्या आई-वडिलांना सांगत असे.१६ मार्चला हिमानीने तिचा भाऊ हिमांशु संजय भंडारे यांना फोन करून, माझे सासरचे लोक खुप त्रास देतात, मला येथे राहवयाचे नाही. तू मला आताच्या आता नगरला घेऊन जाफ, असा फोनएकत्र कुटुंबासह राहत होते. मे २०१२ पासुन पुढे दोन वर्षे फिर्यादीच्या मुलीच्या सासरच्या लोकांनी मुलीला व्यवस्थित नांदवले.
त्यानंतर पतीसह सासू सासरे तिला सतत शारीरीक व मानसिक त्रास देऊन आमची बदनामी करते असे म्हणून उपाशी ठेवून छळ करू लागलेफ, याबाबत हिमानी वेळोवेळी तिच्या आई-वडिलांना सांगत असे.१६ मार्चला हिमानीने तिचा भाऊ हिमांशु संजय भंडारे यांना फोन करून, माझे सासरचे लोक खुप त्रास देतात, मला येथे राहवयाचे नाही. तू मला आताच्या आता नगरला घेऊन जाफ, असा फोन केला होता. हिमानीने १७ मार्चला सकाळी घरी गळफास घेत आत्महत्या केली.
COMMENTS