पुणे। नगर सहयाद्री - पुण्यामधील हडपसर भागात धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका युवकाने मुलीसोबत अश्लीष व्हिडिओ बनवला, नंतर तिला...
पुणे। नगर सहयाद्री -
पुण्यामधील हडपसर भागात धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एका युवकाने मुलीसोबत अश्लीष व्हिडिओ बनवला, नंतर तिला रोज व्हिडिओ व्हाईरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार, आरोपी सूरज चव्हाणने मुलीसोबत मैत्री करत प्रेमसंबंध प्रस्थापीत केले. मुलीशी जवळीक साधत मुलीशी गैरकृत्य करून त्याचा व्हिडीओ बनवला. नंतर तिला रोज व्हिडिओ व्हाईरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हडपसर भागात घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पुणे हादरलं आहे.
या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सूरज चव्हाण असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS