मुंबई । नगर सहयाद्री - शिवसेना पक्ष व चिन्हाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरीने एकमेकांवर निशाणा साधत आहे....
शिवसेना पक्ष व चिन्हाच्या निर्णयानंतर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरीने एकमेकांवर निशाणा साधत आहे. खासदार संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वारंवार निशाणा साधताना दिसत आहेत. मात्र याच आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीची नोटीस दाखल करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थाच्या महतीनुसार, एकनाथ शिंदे भाजपचे गुलाम असल्याची टीका वारंवार संजय राऊत यांच्याकडून होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी या सरकारचा जीव खोक्यात असल्याचे सांगत हे नपुंसक सरकार असल्याचे कोर्टानेही मान्य केल्याची खोचक टीका त्यांनी केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेमुळेच एकनाथ शिंदे फाऊंडेशने आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींच्या मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलताना वारंवार अवमान करत असल्याचे या नोटीसीमध्ये म्हणले आहे.
COMMENTS