बीड। नगर सहयाद्री- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाडव्याच्या दिवशीच ही धक्कादायक घटना घडली आहे. सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराने मालकाच्य...
बीड। नगर सहयाद्री-
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाडव्याच्या दिवशीच ही धक्कादायक घटना घडली आहे. सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराने मालकाच्या 8 वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीला गजाआड केले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून मुळचा लातूर (Latur) जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या नराधमाने गुढी पाडव्याच्या दिवशीचं शेतात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत, शेतमालकाच्याच चिमुकलीला गोठ्यापासून काही अंतरावर नेले व चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उगडकिस आली आहे.या संतापजनक प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.
सायंकाळी आईला पाहून पीडित मुलगी रडू लागली. यावर रडायला काय झाले ? असे आईने विचारले. यावेळी मुलीने सालगड्याने केलेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली. मुलीच्या आईने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात नराधम आरोपी सालगड्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला केज पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाला कठोर शिक्षेची मागणी होत आहे.
COMMENTS